गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील शैक्षणिक संस्थेतून सुरू झालेला हिजाबचा वाद कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. देशभरातील लोक यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्यात आता बिग बॉस ११ फेम महजबी सिद्दीकीने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय ऐकून सगळे आश्चर्य चकित झाले. महजबीने ग्लॅमरचं विश्व सोडत आता हिजाब परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसिम आणि सना खाननेही बॉलिवूडसोडून आपल्या धर्माच्या परंपरांना अनुसरुन वागण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महजबीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही बातमी सगळ्यांना दिली आहे. ही पोस्ट लिहिण्याच कारण म्हणजे, “मी २ वर्षांपासून खूप अस्वस्थ होते, मला समजत नव्हते की काय करावे जेणेकरून माझ्या मनाला शांतता मिळेल. अल्लाहची आज्ञा मोडून व्यक्ती कधीही शांती मिळवू शकत नाही. आपण एखाद्याला आनंदी करण्यासाठी काहीही केले तरी ते लोक आनंदी नसतात. अल्लाहला खुश ठेवणे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी गेल्या एका वर्षापासून सना बेहेनला फॉलो करत आहे. मला अल्लाहची उपासना करून शांती मिळाली आणि माझी इच्छा आहे की अल्लाहने माझ्या पापांना माफ करावे आणि मला योग्य मार्गावर चालण्याची क्षमता द्यावी.”

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आणखी वाचा : श्वेता बच्चनने शेअर केला आई आणि मुलीसोबतचा खास फोटो, म्हणाली “तू…”

मेहजबीने ती ग्लॅमरची दुनिया सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी सना खान आणि जायरा वसीम यांनीही अशाच प्रकारे ग्लॅमरच्या जगाचा निरोप घेतला होता. सध्या देशात सर्वत्र मुस्लिम महिलांनी हिजाब घालण्याचा मुद्दा गाजवला आहे. यावर प्रत्येकाचे मत वेगळे आहे आणि याच दरम्यान मेहजबीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

गेल्या काही दिवसांपासून महजबी तिचे हिजाबमधले फोटो शेअर करत होती. यावेळी तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली होती. काहींनी तिच्या बदललेल्या रुपाची स्तुती केली. तर काहींनी “तू चांगली अभिनेत्री आहेस, तू या इंडस्ट्रीमध्ये काम करत रहा” असं म्हटलं. महजबी सिद्दीकी ‘बिग बॉसच्या ११’ व्या सिझनमध्ये दिसली होती. बिग बॉसच्या घरात ती जास्त काळ नव्हती. पण बाहेर आल्यानंतर ती अगदी ग्लॅमरस लूकमध्ये सगळ्यांसमोर आली होती. पण आता तिने या सगळ्याचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.