एखादं पात्र साकारताना ते पात्र किती लोकप्रिय होईल याचा विचार कोणीही करु शकत नाही. प्रत्येक कलाकाराला सर्वप्रथम भूक असते ती म्हणजे कोणतीही भूमिका मिळवण्याची. एकदा का भूमिका मिळाली की त्यानंतर त्या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेबद्दल विचार केला जातो. अनेकदा असे म्हटले जाते की लोकप्रियता ही फार क्षणिक आहे. ती जेवढ्या लवकर मिळते तेवढीच ती लवकर जाऊही शकते. रातोरात लोकप्रिय होणारे सेलिब्रिटींची आपल्या मनोरंजनसृष्टीत काही कमतरता नाही. लोकप्रियतेचे हे गणित कोणी अगदी जवळू पाहिले असेल तर ती म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिंदे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पा शिंदे हे नाव घेतलं की याआधी कोण ही? असा प्रश्न सहज विचारला जायचा. पण, ‘भाभीजी घर पर है’ फेम शिल्पा किंवा अंगूरी भाभी म्हटल्यावर मात्र तिच्या भूमिकेची आणि तिची अनेकांनाच आठवण होते. ‘हाये…’ ‘लड्डू के भैय्या…’ ‘इ का?…’ असं म्हणणारी निरागस अंगूरी टेलिव्हीजन विश्वात एक वेगळीच छाप पाडून गेली. सध्याच्या घडीला ती हे पात्र साकारत नसली तरीही छोट्या पडद्यावर अंगुरी हे पात्र घराघरात पोहचवण्याचे मुख्य काम तिने केले आहे.

शिल्पाने ही मालिका सोडली तेव्हा तिच्यावर बरेच आरोप करण्यात आले होते. पण, प्रेक्षकांच्या नजरेत असलेली तिची प्रतिमा काही मलिन झाली नाही. या मालिकेशिवाय तिने ‘संजीवनी’, ‘भाभी’, ‘मायका’, ‘चिडीया घर’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

शिल्पाच्या आजवरच्या कारकिर्दीत बरेच अडथळे आले. तिच्यावर बरेच आरोपही करण्यात आले. पण, याच आरोपांच्या आणि वादांच्या बळावर तिला ‘बिग बॉस’ या प्रचंड गाजणाऱ्या रिअॅलिटी शोमध्ये स्थान मिळाले. या कार्यक्रमात शिल्पा येणार ही माहिती जाहीर होताच तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

अर्थात हे काही मोठं यश नसले तरीही शिल्पाच्या दृष्टीने तिच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट नक्कीच ठरु शकते. तेव्हा आता ‘बिग बॉस’च्या घरात तिचा टिकाव लागतो का? भाभीजीला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं का? हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 11 who is shilpa shinde profile biography photos and videos