टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १२’ या रिअॅलिटी शोची स्पर्धक सृष्टी रोडे तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बिग बॉस’मध्ये असताना सृष्टी आणि तिचा प्रतिस्पर्धी रोहित सुचांती यांच्या नात्याची बिग बॉसच्या घरात आणि प्रेक्षकांमध्येही चर्चा झाली. अभिनेता मनिष नागदेवसोबत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने वारंवार बिग बॉसच्या घरात स्पष्ट केलं. तर दुसरीकडे रोहितने नेहमीच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’च्या बाराव्या पर्वाचा अखेर झाला आणि त्याच्या आठवड्याभरातच सृष्टी आणि मनिषचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपवर अद्याप सृष्टीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून आपण आता नात्यात नसल्याचं मनिषने मात्र स्पष्ट केलं आहे.

सृष्टी आणि मनिष गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांचा रोका (साखरपुडा) पार पडला होता. त्याच वर्षी हे दोघं लग्न करणार होते. पण काही कारणास्तव त्यांनी विवाहसोहळा पुढे ढकलला. ‘बिग बॉस १२’ संपल्यानंतर आठवड्याभरातच मनिषने सृष्टीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. तेव्हापासूनच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. या ब्रेकअपसाठी बिग बॉसच्या घरात रोहित सुचांतीचं सृष्टीच्या जवळ येणं कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे.

https://www.instagram.com/p/BnOSDV7Fwce/

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मनिष या ब्रेकअपविषयी म्हणाला, ‘काही मतभेदांमुळे आम्ही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरवल्याप्रमाणे काही गोष्टी घडत नव्हत्या आणि एकमेकांसाठीच्या आमच्या अपेक्षा चुकीच्या वाटत होत्या. त्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी आम्ही आमच्या भविष्याबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा शेवट ब्रेकअपने झाला.’ यावेळी कोणताही तिसरा व्यक्ती आमच्या ब्रेकअपसाठी जबाबदार नसल्याचं मनिषने स्पष्ट केलं.

https://www.instagram.com/p/BrzPw3vleVL/

सृष्टी आणि मनिषच्या ब्रेकअपवर रोहित म्हणाला, ‘प्रेक्षकांनी शो पाहिला आहे. मी कुठे माझी मर्यादा ओलांडली का हे प्रेक्षकांनीच ठरवावं. सृष्टी आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जो काही निर्णय घ्यायचा असेल त्यात माझा काहीच संबंध नाही. ती हुशार असून जो काही निर्णय घेईल तो योग्यच असेल असं मला वाटतं.’

 

Story img Loader