छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक ‘बिग बॉस १४’ सिझनची विजेती ठरली. ‘बिग बॉस’नंतर रुबीना कोणत्या ना कोणत्या करणामुळे सतत चर्चेत आहे. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर रुबीना सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिला सतत वेगवेगळ्या ऑफर्स येत आहेत आणि आता लवकरच ती  मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. म्हणजे रुबीना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रुबीना सध्या कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘शक्‍त‍ि- अस्‍त‍ित्‍व के एहासास की’मधे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तिला या मालिकेसाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. रुबीना लवकरच ‘अर्ध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. यात पलाश मुच्छल देखील दिग्दर्शक म्हणून बॉलिवुडमधे पदार्पण करणार आहे. रुबीना बरोबर यात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता हितेन तेजवानी आणि कॉमेडियन राजपाल यादव देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटचे चित्रीकरण सप्टेंबेर महिन्यात सुरू होणार असून हा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

रुबीना दिलैक, हितेन तेजवनी स्टारर ‘अर्ध’ या चित्रपटाचा पहिला लुक पलाशने ट्वीट करून शेअर केला आहे. यात ते दोघं ग्रामहिण भागातील सामान्य माणसाची व्यक्तीरेखा साकारताना दिसतील. तसंच यामधला तिचा लुक देखील वेगळा आहे ज्यामुळे तिच्या फॅन्सची उत्सुकता वाढली असल्याचे दिसून आले.

दरम्यान रुबीना सध्या नवीन म्युझिक व्हिडीओवर काम करत आहे. यात ती पती अभिनेता अभिनव शुक्लासोबत रोमॅन्स करताना दिसेल. या आधी देखील तिने ‘ मरजानेया’या म्युझिक व्हिडीओमध्ये  त्याच्यासोबत काम केले होते.