छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपासून अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी चर्चेत आहेत. त्यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष त्यांनी वेधले होते. अभिजितने देवोलिनाकडे कोणताही विचार न करता सगळ्यांसमोर किस करण्याची मागणी केली होती. त्यानंतर देवोलिना आणि अभिजीतमध्ये मोठा वाद झाला. त्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सलमानने यावेळी विकेंड का वार मध्ये अभिजितला सुनावले आहे. अभिजितने केललं वक्तव्य बिग बॉसला आवडलेलं नाही. त्यानंतर आता देवोलिनाची आई अंतिमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “माझ्या मुलीला अशा प्रकारे बोलून अभिजितने तिचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.” खरतरं अभिजितने फक्त देवोलिनाशी नाही तर राखी सावंतशी देखील वाद घातला होता.

आणखी वाचा : मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा विवाहसोहळा निसर्गसौंदर्याने वेढलेल्या मालवणात, पाहा फोटो

अभिजितच्या वक्तव्यावर अंतिमा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘ईटाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “जे काही झालं ते अतिशय राग येणार होतं. मला वाटलं अभिजित हा तिला आपल्या बहिणीप्रमाणे मानतो. मात्र प्रत्यक्षात त्याचे विचार काही वेगळेच असल्याचे आता दिसून आलं आहे. सुरुवातीला देवोलिनाला असं वाटलं होतं की, अभिजित तिची मस्करी करतोय. मात्र तो तसा करत नव्हता. त्यानं जे काही केलं त्याचं समर्थन होऊ शकत नसल्याचे” , देवोलिनाची आई अंतिमा म्हणाल्या.

Story img Loader