बिग बॉस १५ च्या अंतिम सोहळ्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. नुकत्याच ‘तिकिट टू फिनाले’चा टास्क पार पडला. अनेकदा टास्क रद्द झाल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या या टास्कमध्ये घरातील सदस्यांनी जिंकण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये रश्मि देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांनी तर कमालच केली. या दोघीही टास्क पूर्ण करण्यासाठी १५ तास एका जागी एका पोलवर उभ्या राहिल्या. घरातील सदस्यांनी बराच त्रास दिल्यानंतर या दोघींनी टास्क जिंकण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मि आणि देवोलिनाच्या या टक्करच्या लढाईत रश्मिनं बाजी मारली मात्र या दोघींनी टास्क पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहून चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर दोघींचंही कौतुक केलं. पण या टास्कमध्ये एक अशी वेळही आली जेव्हा देवोलिनानं त्याच ठिकाणी लघुशंका केली. दरम्यान असं करण्याआधी देवोलिनानं प्रतीक सहजपालला तिच्या अंगावर पाणी फेकण्यास सांगितलं होतं आणि त्यानंतर तिने पोलवर उभ्या- उभ्याच लघुशंका केली.

शेवटच्या फेरीत देवोलिनाच्या पायावर जोरात पाणी फेकलं. ज्यामुळे तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. संपूर्ण टास्कमध्ये देवोलिनाला उमर रियाजनं तर रश्मिला प्रतीक सहजपालनं बराच त्रास दिला. या दोघींवर पाणी फेकलं, हाता- पायांवर तेल, शॅम्पू यांसारख्या गोष्टी ओतल्या ज्यामुळे त्या दोघीं घसरतील किंवा टास्क सोडून देतील.

दरम्यान ‘तिकिट टू फिनाले’च्या या टास्कनंतर रश्मि देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे. या दोघींच्याही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे सध्या या दोघींची नावं सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 15 devoleena urinated in her pants during ticket to finale task mrj