छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस १५.’ लवकरच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शोचा सूत्रसंचालक बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शोमध्ये अभिनेते धर्मेंद्र आणि भारती सिंह यांना बोलावले. दरम्यान, दोघेही सलमानसोबत मजामस्ती करताना दिसत होत. अशातच धर्मेंद्र यांनी मुलगा बॉबी देओलचा एकभन्नाट किस्सा सांगितला आहे.

सलमान खान धर्मेंद्र यांना ‘शोले’ चित्रपटातील टाकीवरील सीन रिक्रिएट करण्याची विनंती करते. ते पाहून स्पर्धकांना हसू अनावर होते. बिग बॉसचा स्पर्धक प्रतीक सहजपाल आणि उमर रियाज जय आणि वीरुची भूमिका साकारतात. प्रतिक आणि उमरचा ड्रेस पाहून भारती सिंह त्यांची खिल्ली उडवते. त्यावेळी धर्मेंद्र हे ‘शोले’मधील एक किस्सा सांगतात.
आणखी वाचा : ‘तुझे आतापर्यंत किती ब्रेकअप झाले’ असे विचारणाऱ्याला कमल हासन यांच्या मुलीचे सडेतोड उत्तर, म्हणाली…

‘शोले’ चित्रपटातील एका सीनसाठी लहान मुलाची गरज होती. त्यासाठी आम्ही बॉबी देओलला तयार केले होते. कारण बॉबी त्यावेळी लहान होता. बॉबीसाठी एक ड्रेस शिवण्यात आला होता. पण बॉबी चड्डी न घालताच सेटवर पोहोचला होता असे धर्मेंद्र म्हणाले. ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.

दरम्यान, भारती मजेशीर अंदाजात सलमानला चिडवताना दिसते. ‘सलमान भाईचा वाढदिवस होता. त्याने केक कापला आणि साप त्याला चावला’ हे ऐकून स्पर्धकांना धक्कास बसतो. त्याच वेळी धर्मेंद्र मजेशीर अंदाजत म्हणतात, ‘वो सांप नहीं, वो संपनी होगी.’ ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.