छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. या शोमध्ये सतत स्पर्धकांमध्ये भांडणे आणि वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस १५’मध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून अभिजीत बिचुकले, राखी सावंत आणि तिचा पती रितेश, देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई यांची एण्ट्री झाली. बिग बॉसमध्ये राखी आणि तिचा पती रितेश यांच्या नात्यावर आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच भर कार्यक्रमात आता राखी आणि रितेशमध्ये भांडण झाल्याचे दिसत आहे.
नुकतंच बिग बॉसच्या १५ व्या पर्वात ‘तिकीट टू फिनाले’ हा खेळ रंगला. या खेळात सर्वच स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी राखी ही तिचा पती रितेशला हा खेळ नेमका काय आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यादरम्यानच राखी आणि रितेशमध्ये जोरदार भांडण झाल्याचे बोललं जात आहे.
यावेळी राखी रितेशला समजवण्याचा प्रयत्न करत होती की, “देवोलिना आणि रश्मी पुढच्या गेममध्ये तुला फसवतील, त्यामुळे तू त्या दोघांवर विश्वास ठेवू नकोस.” राखी तिचे हेच वाक्य वारंवार रितेशला समजावून सांगत होती. तिचे हे बोलणं ऐकून रितेश चिडतो आणि रागात म्हणतो, “मला तुझा कंटाळा आलाय.”
हेही वाचा : “तुम्ही खासदार आहात”, बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे नुसरत जहाँ ट्रोल
“तू मला नेमकं काय समजवण्याचा प्रयत्न करत आहे, ते मला समजतं आहे. तू मला सतत तेच तेच सांगत आहेस. तू माझ्या जवळ येऊ नकोस. मला समजतं आहे. मला तुझा कंटाळा आलाय,” असे रितेश म्हणतो. यानंतर शमिता त्या दोघांच्या भांडण मिटवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी ती त्या दोघांना सांगते, तुम्ही असे भांडू नका. शांत राहा. यावर राखी म्हणते की मी रितेशचा फार आदर करते. पण तो नेहमीच अशाप्रकारे माझ्यावर चिडतो.