छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १५’ हा लोकप्रिय शो आहे. शोमध्ये असलेल्या स्पर्धकांमध्ये नेहमीच वाद होताना दिसतात. सध्या स्पर्धकांमध्ये दंगल सुरु झाली आहे. आगामी एपिसोडमध्ये जय भानुशाली आणि प्रतीक सहजपाल यांच्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळणार आहे. त्या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली आहे. त्यांच्या या भांडणात बिग बॉसच्या घराचा काचेचा दरवाजा तुटला आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसने एका नव्या टास्कची घोषणा केल्याचे नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे. यामध्ये जंगलवासियांना एक नकाशा देण्यात आला आहे. प्रतीक सहजपाल नक्शा चोरण्याचा निर्णय घेतो आणि तो नकाशा लपवतो. यामुळे जय आणि प्रतीकमध्ये भांडण होतं.

आणखी वाचा : KBC 13 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

‘बिग बॉस’च्या घरात असलेले सगळे स्पर्धक नकाशा शोधण्यासाठी मुख्य घरात जाण्याचे ठरवतात. नकाशाच्या शोधात ते सोफा, ब्लँकेट आणि बेड उचलतात. त्यावेळी जयचे लक्ष हे बाहेर असलेल्या प्रतीककडे गेले आणि प्रतीकच्या हातात नकाशा पाहतो. प्रतीक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि दोघांमध्ये भांडण होतं. करण कुंद्रा ओरडतो की सगळे शांत आहेत आणि प्रतीक फिजिकल होत आहे. वाद सुरु झाल्यानंतर प्रतीक जयची कॉलर पकडतो.

आणखी वाचा : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ आला समोर

जय बिग बॉसकडे तक्रार करतो की प्रतीक कॉलर पकडत आहे. तर रागात जय प्रतिकला बोलतो की बिग बॉसच्या घरा बाहेर कॉलर धरून दाखव, त्यानंतर तो प्रतीकला शिवीगाळ करतो. पुढे त्यांच्याच पुन्हा एकदा वाद झाला आणि हाणमारी झाली. दोघे ही बिग बॉसच्या घरातील कोणत्याही स्पर्धकाचे ऐकत नाही. प्रतीक आणखी चिडतो आणि तो घरात असलेल्या काचेच्या दारावर दणके देत राहतो आणि शेवटी काच फुटते.