बिग बॉस १५ च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. शोच्या अगदी सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये सुरू असलेले वाद अद्याप संपायचं नाव घेत नाहीयेत. शनिवारी झालेल्या ‘विकेंड का वार’मध्येही असंच काहीसं घडलं. पुन्हा एकदा प्रतीक आणि करण यांच्यात भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर या वादात करण कुंद्रानं ‘तुझी आई मूर्ख आहे असं’ म्हटल्यानं प्रतीक सहजपाल भडकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीला तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल यांचं भांडण झालं होतं. त्यावेळी त्यानं तेजस्वीला स्टुपिड म्हणजेच मूर्ख म्हटलं होतं. त्यावर त्याला करण कुंद्रानं सुनावलं. ‘तुझ्या घरी तुझी आई आणि बहीण यांच्यासोबतही तू असंच बोलतोस का?’ असं करणनं प्रतीकला म्हटलं होतं. यावर प्रतीकनंही ‘स्टुपिड’ अर्थात मूर्ख हा चुकीचा शब्द नाही असं उत्तर दिलं होतं.

प्रतीकच्या या स्पष्टीकरणानंतर करण त्याला चिडवण्यासाठी सातत्यानं या शब्दाचा वापर करत राहिला. एवढंच नाही तर त्यानं भांडणात प्रतीकला ‘तुझी आई मूर्ख आहे’ असं देखील म्हटलं. आपल्या आईबद्दल असे शब्द ऐकल्यानंतर मात्र प्रतीक भडकला. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याचंही पाहायला मिळालं. दोघांमध्ये धक्का-बुक्कीही देखील झाली मात्र घरातील इतर सदस्यांना त्यांना थांबवलं. पण करणच्या या कमेंटनंतर प्रतीक फारच भावुक झालेला पाहायला मिळाला.

प्रतीकच्या आईवर अशाप्रकारची कमेंट केल्यामुळे घरातील इतर सदस्यही करण कुंद्रावर चिडलेले पाहायला मिळाले. प्रतीकच्या आईबाबत अशाप्रकारची कमेंट केल्यानंतर करणला थांबवायचं सोडून तेजस्वी देखील त्याला पाठिंबा देताना दिसली. त्यावरून राखी सावंतनं तिला सुनावलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 15 karan kundra comment on pratik sahajpal mother call her stupid mrj