छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. सध्या ‘बिग बॉस’चे १५ वे पर्व सुरु आहे. शोमध्ये नेहमीच स्पर्धकांमध्ये भांडण नेहमीच चर्चेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र, यावेळी दोन स्पर्धकांमध्ये आलेली जवळीक प्रेक्षकांना पटत नसल्याचे चित्र दिसत आहे. ‘बिग बॉस’मध्ये असलेले स्पर्धक ईशान सहगल आणि मायशा अय्यर यांच्यात आलेली जवळीकता प्रेक्षकांना आवडलेली नाही.

कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ईशान आणि मायशा हे दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. तर ते दोघे ही एकाच चादरीत गेल्याचे दिसत आहे. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना संताप आला आहे.

यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस’ अश्लीलता दाखवत असल्याचे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणाला, “कृपया ईशान आणि मायशाला शोमधून बाहेर काढा. जेव्हा हा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा मी आणि आई टिव्ही पाहत होतो आणि रिमोर्ट आईच्या हातात होतं. प्रोमोची सुरूवात ही एका किसने झाली. एका फॅमिली शोमध्ये असं काही दाखवणं चुकीच आहे. मला लाज वाटतं होती. एवढ्या पटकन तर ईशान बोलत सुद्धा नाही.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सेन्सॉर बोर्ड कुठे आहे. फॅमिली शोला अश्लील शो बनवला आहे. हा अमेरिका नाही भारत आहे थोडीतर लाज ठेवा.” तिसरा नेटकरी म्हणाला, “बिग बॉस हे खूप वाईट आहे. हा एक फॅमिली शो आहे आणि संपूर्ण कुटुंब हा शो पाहतो”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मायशा आणि ईशानसोबत ‘बिग बॉस’ला ही ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

आणखी वाचा : “त्या दिवशी बाळासाहेब नसते तर…”, अमिताभ यांनी केला होता खुलासा

‘वीकेंड का वार’ या एपिसोडच्या वेळीही मायशा आणि ईशान एकमेकांचा हात धरून बसले होते. ईशानने मायशाला सांगितले की, ८ दिवसांपूर्वी भेटली असली तरी त्याला तिच्याशी एक कनेक्शन असल्याचे जाणवते. यानंतर दोघांनी एकमेकांना किस केले.