छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो जितका वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. नुकतंच बिग बॉसच्या ‘विकेंड का वार’मध्ये कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी हजेरी लावली. यावेळी त्या दोघांनीही सलमान खानसोबत खूप मजामस्ती केल्याचे दिसत आहे. यादरम्यान भारतीने सलमान खानकडे दोन मागण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे सलमाननेही त्या मागण्या हसत हसत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉमेडियन भारती सिंह ही प्रेग्नंट आहे. नुकतंच ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी बिग बॉसमध्ये हजेरी लावली. यानिमित्ताने ते दोघेही मिठाई घेऊन बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी सलमानने त्या दोघांचे अभिनंदन केले. यादरम्यान भारती सलमानला सांगते, ‘सर करण जोहरने आमच्या मुलाला सिनेसृष्टीत लाँच करण्यास नकार दिला आहे, तर तुम्ही आमच्या बाळाला लाँच कराल का?’ त्यावर सलमान म्हणतो, ‘हो नक्कीच मी तुमच्या बाळाला लाँच करेन.’

यानंतर भारती सलमान खानला विचारते की, ‘सलमान सर आम्हाला तुमचे फार्महाऊसही बेबी शॉवरसाठी द्याल का?’ त्यावरही सलमान खान होकार देतो. यानंतर भारती हर्षला म्हणते, ‘हे बघ, मी म्हणाली होती ना की आपण सलमान सरांना मिठाई खायला देऊया, ते आपल्यासाठी सर्वकाही करतील.’ दरम्यान भारतीचे हे वाक्य ऐकताच सलमान खानसह सर्वचजण जोरजोरात हसू लागतात.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आई-वडील होणार आहेत. कॉमेडियन भारती सिंगने काही महिन्यांपूर्वी आपल्या युट्युब चॅनलद्वारे एका वेगळ्या अंदाजात ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. भारती सिंह एप्रिलमध्ये मुलाला जन्म देणार आहे.