गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय, तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ची चर्चा तुफान रंगताना दिसत आहे. ‘बिग बॉस’चा १५ वा सीजन लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यंदा ‘बिग बॉस’ने आपले माध्यम बदले आहे. हा शो पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर हा शो टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येईल. या शो बद्दलं आता प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. आता लवकरचं ही सगळी कोडी उलगडणार आहेत. कारण नवीन सीजनचा पहिला टिजर अखेर रिलीज झाला आहे.
‘बिग बॉस’च्या ओटीटी व्हर्जनचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निर्माता करण जोहर करणार असून त्याने नुकताच सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चा नवीन टीजर शेअर केला आहे. हा टीजर शेअर करताच प्रेक्षकांची उत्सुक्ता अजून वाढली असल्याचे दिसून येते आहे. करण जोहरने शेअर केलेला टीजर पाहून या सीजनमध्ये क्रेझीनेस आणि फुल्ल ऑन मनोरंजनाची मेजवानी असणार आहे असे दिसून येत आहे. होस्ट करण जोहानरने शेअर केलेल्या टीजरमध्ये तो “या नवीन सीजनसाठी काही कल्पना आहेत…” अशी सुरवात करताना दिसतो. एक निर्माता म्हणून करण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना देतो. तसंच स्पर्धकांनी काही चुका केल्या तर काय शिक्षा सुनावली जाईल असे काही लोकांना सांगताना दिसतं आहे. या टीजरमध्ये, सीजनमध्ये काय होणार आहे याची कल्पना येत नाही. मात्र आगामी सीजन मनोरंजक असणार आहे इतकं नक्की कळते.
करणने ‘बिग बॉस’ १५ चा हा टीजर शेअर करताच हा टीजर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ‘बिग बॉस’चा हा सीजन पहिले काही आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्म वूट वर प्रदर्शित होणार आहे. ज्याचे सूत्रसंचालन करण जोहर करताना दिसले. नंतर टीव्हीवर याचे सूत्रसंचालन सलमान खान करेल. या शोच शुटिंग सुरू झाले असून सध्या स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ओटीटीवर हा शो येत्या ८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.