‘बिग बॉस ओटीटी’चा सगळ्यात पहिला शो टेलिकास्ट झाला. पहिल्या दिवसाच्या लाईव्ह फीडमध्ये बिग बॉसच्या घरातलं पहिलं वहिलं भांडण पहायला मिळालं. एकीकडे स्पर्धकांच्या गॉसिपींगला सुरूवात झाली तर दुसरीकडे अक्षरा सिंहला रडू कोसळलं. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी आपआपले खरे रंग दाखवण्यास सुरूवात केलीय.

बिग बॉसने स्पर्धकांना पहिला टास्क दिला होता. खरं तर बिग बॉसच्या ग्रॅण्ड प्रीमिअरमध्येच प्रतीक सहजपाल आणि दिव्या अग्रवाल यांच्यामध्ये कुरबूर सुरू झाली होती. घरात गेल्यानंतर मात्र त्यांच्यातील कुरबूरीने भांडणाचं स्वरूप धारण केलं. जोपर्यंत घरातील सदस्यांना आपआपली ड्यूटी सांगितली जात नाही तोपर्यंत प्रत्येकाने आपली कामं स्वतः करा, या मुद्द्यावरून प्रतीकवर दिव्या भडकते. यात दोघांमध्ये भांडण सुरू होतं. बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण घर प्रतीकच्या विरोधात जाताना दिसून आलं. शमिता शेट्टी, उर्फी जावेद, अक्षरा सिंह, करण नाथ सुद्धा प्रतीकच्या विरोधात जातात. यात शमिता शेट्टी सुद्धा उडी घेते आणि म्हणते फुटेजसाठी प्रतीक घरातील सर्व सदस्यांसोबत भांडणं करतोय.

बिग बॉस कुटुंबातील सदस्यांना पहिला टास्क देतात. या टास्कमध्ये लाइव्ह नाइट रंगली. यामध्ये सर्व स्पर्धकांना परफॉर्मन्स द्यावा लागला. नेहा भसीनने तिचं सिग्नेचर गाणं ‘बाजरे का सीता’ गायलं. त्याचवेळी मिलिंद गाबा देखील त्याचा परफॉर्मन्स सादर करतो. दिव्या या लाइव्ह नाइटचा टास्क होस्ट करते.

ऊर्फी जावेदला झीशान खानच्या डोळ्यांकडे एकटक पाहण्याचा टास्क सांगितला जातो. त्याचवेळी, जीशान आणि प्रतीक सेहजपाल पुश अप करतात. टास्क दरम्यान, पुन्हा एकदा दिव्या अग्रवाल आणि प्रतीक सहजपाल यांच्यात लढत होते.

दिव्या अग्रवाल स्वतःला टास्कपासून दूर करते. प्रतीक सहजपालच्या वर्तनाबद्दल दिव्या अक्षरा सिंग आणि मूसकडे तक्रार करते. त्याच वेळी, रिद्धिमा पंडित स्टेजवर येते आणि करीना कपूर आणि कंगना रणौतची नक्कल करते.

शेवटी दिव्या स्वतः स्टेजवर येते आणि परफॉर्म करते. तिथे असताना, प्रतीक एक रॅप गातो. यानंतर अक्षरा सिंगने तिचं गाणं गायल्यानंतर दिव्या म्हणते की तिची मानसिक पातळी अस्वस्थ होत आहे.

अक्षरा सिंह मूस जट्टानाच्या वर्तनाबद्दल तक्रार करते. अक्षरा सिंग सांगते की, मूस तिच्या भोजपुरी गाण्यांची खिल्ली उडवते. याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करते, असं देखील अक्षरा सांगते. अक्षरा सिंह बाहेर येते आणि दिव्या अग्रवाल आणि मूस जट्टानाशी बोलत असते. दिव्या अग्रवाल अक्षरा सिंगला समजावण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी अक्षरा खूप रडू लागते.

त्यानंतर मूस जट्टाना, अक्षरा सिंह आणि मिलिंद गाबा यांच्यातील संवादानंतर संपूर्ण घरातील सदस्य मूस चुकीची होती की नाही यावर चर्चा करताना दिसून येतात.

बीग बॉसच्या घरातून बाहेर होण्यासाठीच्या या आठवड्यातील नामांकनात दिव्या अग्रवालचा समावेश आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाचा सीझन २४ तास थेट सुरू आहे. बिग बॉस ओटीटी 1008 तास लाइव्ह राहणार आहे.