छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १५’ हा लोकप्रिय शो आहे. शोमध्ये असलेल्या स्पर्धकांमध्ये नेहमीच वाद होताना दिसतात. सध्या स्पर्धकांमध्ये दंगल सुरु झाली आहे. त्यात स्पर्धक प्रतीक सहजपाल हा सतत स्पर्धकांशी वाद घालतो किंवा भांडण करताना दिसतो. आगामी एपिसोडमध्ये विधी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना प्रतीक बाथरूमचं कुलूप तोडताना दिसणार आहे.
बाहेर येऊन विधी करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुषाली आणि इतर स्पर्धकांना या विषयी सांगते. त्यानंतर ती प्रतीकसोबत या विषयी बोलते, “कोणी आंघोळ करत असताना तू हे का केलस?” एखाद्या मुलीसाठी हे भीतीदायक आहे. यावर प्रतीक बोलतो, तिथे आत कोणी आहे याची त्याला परवा नाही. तर तिथे उपस्थित असलेला करण प्रतीकचे उत्तर ऐकूण संतापतो आणि कोणत्याही मुलीसोबत असं करू नकोस असं सांगतो. तेजस्वी प्रकाश प्रतीकला सांगतो की जरी त्याचा हेतू चांगला होता, पण त्याने असे काही करणे ठीक नाही.
आणखी वाचा : आर्यन खानच्या अटकेनंतर सुहाना खानची पहिली पोस्ट
आणखी वाचा : आर्यनचा अंधश्रद्धेवर विश्वास? सुनावणी आधी हातात दिसली काळ्या मोत्यांचे ब्रेसलेट
सध्या बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आणि जंगलात असलेल्या स्पर्धकांमध्ये दंगल पाहायला मिळत आहे. प्रतीकने विधीला घाबरवण्यासाठी बाथरूमचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा ती आंघोळ करत असल्याचं त्याला कळालं तेव्हा तो कुलूपसोबत खेळू लागला. सध्या बिग बॉसमध्ये असलेला करण कुंद्रा चर्चेत आहे.