छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे हे १५ वे पर्व आहे. ‘बिग बॉस’च्या घरात नेहमीच टास्क होत असल्याचे आपल्याला दिसते. यावेळी बिग बॉसने स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागलं आहे. एका टीमचे नाव घरवासी तर दुसऱ्या टीमचे नाव हे जंगलवासी असे ठेवण्यात आले आहे. या टास्कचे ५ राऊंड होणार होते. जंगलवासी जर हा टास्क जिंकले तर त्यांना घरात जाणाऱ्या नकाशाचे ३० तुकडे मिळणार आणि अपयशी ठरले तर त्यांच्याकडे असलेले नकाशाचे तुकडे परत घेतले जाणार. जंगलवासींनी हा टास्क आक्रमकपणे खेळला. जंगलवासींनी स्पर्धक निशांत भट्टवर शारीरिक बळाचा वापर केला, ज्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. जय आणि करणने निशांतला ब्लॉक केले आणि शमिता निशांतला वाचवण्याचा प्रयत्न करत होती.
यावेळी, शमिताला पाय धरून खेचण्यात आला आणि यावर प्रतीक म्हणाला की तिला दुखापत झाली पाहिजे या हेतूनेच त्यांनी तिला धरले होते. मात्र, तेजस्वी म्हणाली की “जंगलवासी असलेली मुलं असं नाही करणार.” यात प्रतीक आणि जयमध्ये वाद होतो. प्रतीक जयला बोलतो की “शमिताला गंभीर दुखापत झाली आहे आणि जर तो बाहेर असता तर त्यांने जयला अद्दल घडवली असती.” यावर संतापलेला जय प्रतीकला बोलतो की “जर हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.” तेव्हा जय प्रतीकला आईवरून शिवी देतो आणि त्यानंतर भांडण सुरु होतं.
आणखी वाचा : समीर वानखेडेंच्या करिअरमागे आहे ‘या’ जवळच्या व्यक्तीचा हात, पत्नी क्रांतीने केला खुलासा
प्रतीक रागात जयला बोलतो की शिवीगाळ करू नकोस. मात्र, जय तिथेच थांबत नाही तर तो प्रतीकसमोर येऊन मारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रतीक जयला अशिक्षित बोलतो. यानंतर प्रतीक स्वत:वरचे नियंत्रण गमावतो, खाली बसतो आणि रडतो त्यानंतर स्वत:च्या कानशिलेत लगावू लागतो.
आणखी वाचा : अमिताभनं आता तरी निवृत्ती घ्यावी, सलीम खानांचा प्रेमळ सल्ला
शमिता प्रतीकला समजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर विशाल कोटियन देखील प्रतीकला समजवतो आणि बोलतो की जर तू मला भाऊ मानत अशील तर माझं ऐकशील. मात्र, प्रतीक थांबत नाही आणि स्वत:च्या कानशिलेत लगावतो आणि रडतो. तर भावनिकतदृष्ट्या खचलेला प्रतीक बोलतो की तो शोमधून बाहेर जाण्यासाठी तयार आहे.