बिग बॉस १५ च्या महाअंतिम सोहळ्याला आता काहीच दिवस उरले आहेत. येत्या ३० जानेवारीला या शोचा ग्रँड फिनाले असणार आहे आणि त्याचवेळी विजेत्याचं नाव घोषित केलं जाणार आहे. पण त्याआधी बिग बॉसच्या घरात नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. अगदी अलिकडेच अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता राखी सावंतही शॉकिंग एव्हिक्शनमध्ये एलिमिनेट झाल्याचं बोललं जात आहे.
देवोलिना आणि अभिजित घरातून बाहेर पडल्यानंतर शेवटच्या आठवड्यासाठी प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, राखी सावंत आणि रश्मि देसाई यांची नाव विजेतेपदाच्या शर्यतीत होती. पण आता या सदस्यांमधू एकजण घरातून बाहेर पडणार आहे ती म्हणजे राखी सावंत. अर्थातच राखीच्या चाहत्यांसाठी तिचं अशाप्रकारे घरातून बाहेर पडणं धक्कादायक आहे.
बिग बॉसबाबत सर्व महत्त्वाचे अपडेट देणाऱ्या ‘द खबरी’नं याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून याची माहिती दिली. ‘राखी सावंत बिग बॉस १५ मधून बाहेर पडली आहे.’ अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. जर हे वृत्त खरं असेल तर मग आता बिग बॉसच्या घरात फक्त ६ सदस्य उरले आहेत. राखी सावंत घरातून बाहेर पडल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान आता राखी सावंतच्या नंतर बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याशिवाय बिग बॉस १५ चा विजेता कोण होणार याबाबत सोशल मीडियावर उलट- सुलट चर्चा सुरू आहे. राखी सावंत बद्दल बोलायचं तर ती बिग बॉसची सर्वाधिक मनोरंजन करणारी सदस्य ठरली आहे. तिने मागच्या सीझनमध्येही बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती.