बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यापासून राखी सावंत आणि तिचा पती राकेश हे दोघेही सातत्याने चर्चेत आहे. कधी बिग बॉसमध्ये भांडणामुळे तर कधी राकेशच्या पहिल्या पत्नीमुळे ते दोघेही कायम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानतंर त्याला पहिले लग्न, पत्नी यावरुन विविध प्रश्न केले जात आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीदरम्यान या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतचा पती रितेश त्यांच्या दोन्ही लग्नांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये आणि त्यानंतरच्या अनेक मुलाखतींमध्ये राखीला पत्नी म्हणून सांगणाऱ्या रितेशने आता राखीसोबतचे लग्न वैध मानण्यास नकार दिला आहे.
रितेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान म्हणाला, राखी सावंतसोबत माझे अद्याप कायदेशीर लग्न झालेले नाही. मी माझ्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यावर तिने अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे राखी सावंत ही अद्याप कायदेशीररित्या रितेशची पत्नी झालेली नाही.
यावेळी रितेशला राखीसोबत नेमकं लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, जेव्हा माझ्या पहिल्या पत्नीने लावलेले सर्व आरोप चुकीचे सिद्ध होतील, तेव्हा मी राखी सावंतशी औपचारिकपणे लग्न करेल. माझ्या पहिल्या पत्नीने माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे मला आधी हे सगळं क्लिअर करावं लागेल. त्यानंतर मग आम्ही औपचारिकपणे लग्न करू, असे रितेश म्हणाला.
त्यावेळी माझ्या मनात अनेक विचार येत होते. राखीचेही करिअर माझ्यासमोर होते. विशेष म्हणजे त्यावेळी माझेही बरेच प्रोजेक्ट्स चालू होते. त्यादरम्यान मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पण माझी पत्नी कागदपत्रांवर सही करण्यास नकार देत आहे., असेही त्याने म्हटले.