राखी सावंतचा पती रितेश बिग बॉस १५ मधून बाहेर पडला आहे. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत रितेशनं त्याचं पहिलं लग्न, पहिली पत्नी आणि राखी सावंतशी त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत बरेच खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर आता रितेशच्या आईनंही राखी आणि रितेशच्या लग्नावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. रितेशच्या आईचं म्हणणं आहे की, या दोघांच्या लग्नाबाबत त्यांना काहीच कल्पना नव्हती. जेव्हा त्यांनी बिग बॉस पाहिलं तेव्हा त्यांना हे सर्व समजलं.
रितेशनं जेव्हा बिग बॉसच्या घरात राखीसोबत एंट्री केली होती. तेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीनं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. याशिवाय तिचा भाऊ रविकांतनंही रितेशवर खटला दाखल करण्याची मागणी केली होती. राकेशच्या पहिल्या पत्नीच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार रितेशच्या पहिल्या पत्नीचं नाव स्निग्धा प्रिया आहे. तिचं लग्न १ डिसेंबर २०१४ रोजी रिटायर्ड स्टेशन मास्टर राजेश प्रसाद यांचा मुलगा रितेश राजशी बेतिया येथे झालं होतं. पण लग्नानंतर रितेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी स्निग्धाला मारहाण केली होती.
रविकांत यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटलंय, ‘स्निग्धाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तिच्या सासरच्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. २०१९ साली पटना उच्च न्यायालयानं या दोघांना हे भांडण आपापसात मिटवण्याचे आदेश दिले होते. मात्र या घटनेनंतर स्निग्धा तिच्या माहेरी म्हणजेच बेतिया येथेच राहत आहे.’
रितेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याची आई मधुबाला देवी यांनी आपल्या मुलाच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘रितेश आणि राखीच्या लग्नाबाबत मला माहिती नव्हती. जेव्हा शेजारच्या लोकांनी बिग बॉस पाहिलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं. रितेशनं आयआयटीमधून इंजिनिअरींग पूर्ण केलं होतं आणि तो बंगळुरूमध्ये नोकरी करत होता. नंतर त्याचं परदेशात येण-जाणं सुरू झालं. दरम्यान माझा त्याच्या अद्याप संपर्क झालेला नाही. त्याचं राखीशी लग्न करणं मला अजिबात आवडलेलं नाही. मला ती अजिबात आवडलेली नाही. मात्र तिला एकदा भेटायचं आहे. तिला भेटल्यानंतरच एक सून म्हणून ती कशी आहे हे मी सांगू शकेन.’