बिग बॉस १५ मध्ये नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जाणार आहे. ३१ डिसेंबरला या शोचा एक स्पेशल एपिसोड प्रसारित होत आहे. ज्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हजेरी लावताना दिसणार आहेत. या आठवड्यात ‘विकेंड का वार’ शुक्रवारी होणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान घरातील सदस्यांना विशेषतः अभिनेत्री शमिता शेट्टीला ओरडताना दिसत आहे.

येत्या एपिसोडमध्ये घरातील सदस्य नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करताना दिसणार आहेत. यासोबतच सलमान खानचा अँग्रीमॅन अवतारही पाहायला मिळणार आहे. घरातील सदस्यांचं वागणं आणि टास्क रद्द करण्यावरून सलमान खान रागावताना दिसणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये सलमान खान अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिजित बिचुकले यांच्यावर रागावताना दिसत आहे. शमिताचं बोलणं ऐकून तर तो तिच्यावर जोरात ओरडतानाही दिसत आहे.

aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
Payal Rohatgi reveals ex boyfriend Rahul Mahajan used to hit her
राहुल महाजनने दोन वेळा मारलं, एक्स गर्लफ्रेंडने केलेले गंभीर आरोप; म्हणालेली, “त्याने माझं डोकं…”

सलमान खान घरातील सदस्यांना सातत्यानं टास्क रद्द करण्यावरून सुनावताना दिसत आहे. तो म्हणतो, ‘टास्क रद्द करण्यामध्ये तर तुम्ही सर्वांनी पीएचडी केली आहे. टास्क जर संचालक रद्द करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. पण जर तो सदस्यांनी रद्द केला तर ते बरोबर आहे.’ याशिवाय तो शमितानं राखीसोबत केलेल्या वर्तनासाठी तिला ओरडताना दिसतो. शमिताचं वागणं चुकीचं असल्याचंही तो सांगतो.

सलमानचं बोलणं ऐकल्यावर शमिताला राग येतो आणि ती रागात ओरडून बोलते, ‘माझं दुसऱ्या कोणाशीही असं वागणं नाहीये. तुम्हाला वाटतंय की माझं तिच्याशी असलेलं वागणं चुकीचं आहे तर मला नाही माहीत. शमिताचं बोलणं ऐकल्यावर सलमानलाही राग अनावर होतो आणि तो तिला जोरात ओरडतो. यानंतर शमिता रडू लागते आणि तिथून उठून निघून जाते. दरम्यान मागच्या आठवड्यातही शमिताला सलमान याच कारणावरून सुनावलं होतं.

Story img Loader