छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. दरम्यान, सलमानने सगळ्या स्पर्धकांना उत्साहाने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एपिसोडच्या सुरुवातीला पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जन्नत जुबेरपासून ते शेखर रावजियाना, अनु मलिक आणि इतर काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी जन्नत जुबेरशीबोलत असताना सलमानला राखीचा पती रितेशची आठवण झाली. यावेळी जन्नतने राखीचे कौतुक केले आणि ती सगळ्यांचे मनोरंजन करत असल्याचे सांगितले. राखीने हे पर्व जिंकावा असे ती पुढे म्हणाली.
आणखी वाचा : राम चरणसोबतच्या KISS वर समांथाचं मोठं वक्तव्य, सांगितलं लिपलॉकचं सत्य
यावर आश्चर्यचकित होऊन सलमान म्हणाला, “राखी संपूर्ण जग हे तुझं कौतुक करत आहे. फक्त तो हितेशचं एक आहे, काय नाव आहे त्याचं रितेश, जो असा आहे.” हे बोलत असताना सलमानच्या चेहऱ्यावर तो निराश असल्याचे दिसत होते.
आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!
यावर उत्तर देत राखी म्हणाली, “सर मी यावेळी जाऊन त्याला राखी बांधेने.” सलमान हसत म्हणाला, “तिची राखी बांधण्याची पद्धत वेगळी असेल. ती कशी त्याला मिठी मारेल आणि राखी बांधेल.” दरम्यान, या आधी एका एपिसोडमध्ये रितेशने राखीशी गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचे हे वागणे पाहिल्यानंतर सलमानने रागात त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला.