छोट्या पदड्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रमांपैकी एक असणाऱ्या ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वाची सुरुवात झालीय. याच पर्वाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये घरातील स्पर्धक प्रती सहजपाल हा चांगलाच चर्चेत आहे. तसा तर तो सध्या अनेक स्पर्धांशी वाद घातलाताना आणि आरडाओरड करताना दिसतो. पण नुकतंच त्याने असं काही कृत्य केलंय की त्यावरुन चाहते, प्रेक्षकही त्याच्यावर नाराज आहेत. त्यातच आता कार्यक्रमाच्या पहिल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये होस्ट सलमान खानने याच कृत्यावरुन प्रतीकला फैलावर घेतलंय.

बिग बॉस १५ च्या ‘विकेण्ड का वार’चा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत होस्ट सलमान खान प्रतीक सहजपालच्या कृत्यावरुन त्याला झापताना दिसतोय. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान, प्रतीक सहजपाल आणि विधी पांड्या यांच्यामध्ये बाथरुमचा दरवाजा तोडण्यावरुन झालेल्या वादावर भाष्य करताना दिसत आहेत. सलमान प्रतीकवर फारच संतापलेला दिसतोय. या व्हिडीओवरुन सलमानला या बाथरुमचा दरवाजा तोडण्याचा प्रकरणाचा फारच राग असल्याचं स्पष्ट होतं आहे. आधी नक्की काय घडलं होतं ते पाहूयात…

विधी बाथरूममध्ये अंघोळ करत असतानाच प्रतीकने बाथरूमचं कुलूप तोडलं. बाहेर येऊन विधी करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुषाली आणि इतर स्पर्धकांना या विषयी सांगते. त्यानंतर ती, “एक व्यक्ती अंघोळ करत असताना तू हे का केलं?, एखाद्या मुलीसाठी हे भीतीदायक आहे,” असं प्रतीकला सांगते. यावर प्रतीकने, “तिथे आत कोणी आहे याची त्याला परवा नाही,” असं सांगत विधीचा प्रश्न उडवून लावतो. तर तिथे उपस्थित असलेला करण प्रतीकचे उत्तर ऐकल्यानंतर चांगलाच संतापतो. तसेच तो प्रतीकला यापुढे कोणत्याही मुलीसोबत असं करू नकोस असा सल्लाही देतो. तेजस्वी प्रकाश प्रतीकला सांगतो की, जरी त्याचा हेतू चांगला होता, पण तू असे काही करणे ठीक नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट

यावरुनच सलमान प्रतीकवर संतापलेला दिसतोय. प्रतीककडे इशारा करत सलमान, “माझी आई-बहीण बाथरुममध्ये असती तरी मी गेमसाठी हे केलं असतं असं एखादा म्हणतोय तर याचा अर्थ आई आणि बहिणीपेक्षा गेम मोठा आहे का?” असा प्रश्न उपस्थित करतो. “विधीने ठरवलं असतं तर तुझं काही खरं नव्हतं. माझी बहीण असती तर मी तुझी…” असं वाक्य अर्ध्यावरच थांबवत सलमान आपला राग व्यक्त करतो. सलमानने प्रतीकाला चांगलाच झापलाय असं काही युझर्स सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ पोस्ट करत म्हणत आहेत.

विधी पांड्या अंघोळ करत असतानाच प्रती सहजपाल बाथरुमचा टाळा आणि कडी तोडताना दिसला. यावरुन घरामध्ये मोठा वाद होता होता राहिला. मात्र प्रेक्षकांनी प्रतीकच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली असतानाच आता सलमाननेही प्रतीकला यावरुन फटकारल्याचं प्रमोमध्ये दिसतंय.

Story img Loader