छोट्या पदड्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रमांपैकी एक असणाऱ्या ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वाची सुरुवात झालीय. याच पर्वाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये घरातील स्पर्धक प्रती सहजपाल हा चांगलाच चर्चेत आहे. तसा तर तो सध्या अनेक स्पर्धांशी वाद घातलाताना आणि आरडाओरड करताना दिसतो. पण नुकतंच त्याने असं काही कृत्य केलंय की त्यावरुन चाहते, प्रेक्षकही त्याच्यावर नाराज आहेत. त्यातच आता कार्यक्रमाच्या पहिल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये होस्ट सलमान खानने याच कृत्यावरुन प्रतीकला फैलावर घेतलंय.
बिग बॉस १५ च्या ‘विकेण्ड का वार’चा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत होस्ट सलमान खान प्रतीक सहजपालच्या कृत्यावरुन त्याला झापताना दिसतोय. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान, प्रतीक सहजपाल आणि विधी पांड्या यांच्यामध्ये बाथरुमचा दरवाजा तोडण्यावरुन झालेल्या वादावर भाष्य करताना दिसत आहेत. सलमान प्रतीकवर फारच संतापलेला दिसतोय. या व्हिडीओवरुन सलमानला या बाथरुमचा दरवाजा तोडण्याचा प्रकरणाचा फारच राग असल्याचं स्पष्ट होतं आहे. आधी नक्की काय घडलं होतं ते पाहूयात…
विधी बाथरूममध्ये अंघोळ करत असतानाच प्रतीकने बाथरूमचं कुलूप तोडलं. बाहेर येऊन विधी करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुषाली आणि इतर स्पर्धकांना या विषयी सांगते. त्यानंतर ती, “एक व्यक्ती अंघोळ करत असताना तू हे का केलं?, एखाद्या मुलीसाठी हे भीतीदायक आहे,” असं प्रतीकला सांगते. यावर प्रतीकने, “तिथे आत कोणी आहे याची त्याला परवा नाही,” असं सांगत विधीचा प्रश्न उडवून लावतो. तर तिथे उपस्थित असलेला करण प्रतीकचे उत्तर ऐकल्यानंतर चांगलाच संतापतो. तसेच तो प्रतीकला यापुढे कोणत्याही मुलीसोबत असं करू नकोस असा सल्लाही देतो. तेजस्वी प्रकाश प्रतीकला सांगतो की, जरी त्याचा हेतू चांगला होता, पण तू असे काही करणे ठीक नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा