छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय आहे. सध्या या शोचे १५ वे पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस १५’चे सुत्रसंचालन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करतो. नुकताच या पर्वाचा पहिला ‘विकेंड का वार’ हा एपिसोड प्रदर्शित झाला. यावेळी सलमान नेहमी प्रमाणे स्पर्धकांनी संपूर्ण आठवड्यात केलेल्या गोष्टींवर चर्चा करतो. कधी मजेशीर विनोद करतो तर कधी स्पर्धकांना शिकवण देतो. मात्र, शोमधले सलमानचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. दरम्यान, या वेळी विनोद करत असताना सलमानने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिणी शमिता समोर राज कुंद्राचे नाव घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस १५’च्या ‘विकेण्ड का वार’चा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत होस्ट सलमान खान प्रतीक सहजपालच्या कृत्यावरुन संतापलेला दिसतो. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान, प्रतीक सहजपाल आणि विधी पांड्या यांच्यामध्ये बाथरुमचा दरवाजा तोडण्यावरुन झालेल्या वादावर भाष्य करताना दिसत आहेत. सलमान प्रतीकवर फारच संतापलेला दिसतोय. तर प्रतीकला साथ दिल्यामुळे सलमान निशांतला देखील ओरडला.

आणखी वाचा : ‘कुंद्राला भेट…’, ब्रालेटमध्ये विमानतळावर पोहोचल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

त्यानंतर करण कुंद्राशी बोलत असताना सलमान करणला चुकून राज कुंद्रा अशी हाक मारतो. हे ऐकल्यानंतर शमिता आश्चर्यचकीत होते. नंतर दुसरे स्पर्धक हसू लागल्यानंतर ती देखील हसू लागते. दरम्यान, या विषयी करणने एका मुलाखतीत सांगितले होते की, “पॉनोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राच्या जागी लोक करणला राज कुंद्रा समजत आहेत.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 15 salman khan teases shamita shetty by joking about raj kundra dcp