लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखल जातो. बॉलिवूडचा भाईजान, सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे सध्या १५वे पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या या पर्वाची सुरूवात एकदम दणक्यात झाली आहे. गेल्या पर्वा प्रमाणे या पर्वातही स्पर्धकांमध्ये भांडणे पाहायला मिळत आहेत. शोच्या पहिल्या दिवसापासूनच प्रतिक सहजपालचे स्पर्धकांसोबत भांडण होताना दिसत आहे. तसेच शमिताने प्रतिकला पाठिंबा दिल्यामुळे घरातील स्पर्धकांनी तिच्यावर निशाणा साधला. दरम्यान करण कुंद्रा रागात शमिताला आंटी बोलतो. ते पाहून शमिताची आई सुनंदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शमिताची आई सुनंदा यांनी बिग बॉस १५च्या आगामी भागाचा प्रोमो पाहिल्यावर रागाक कमेंट केली आहे. ‘करण कुंद्राला कोणत्या अँगलने शमिता आंटी दिसते?’ असे सुनंदा यांनी म्हटले आहे. पुढे कमेंटमध्ये त्यांनी सलमान खानला विनंती करत या विरोधात पाऊस उचलण्याची विनंती केली आहे. सुनंदा यांची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बिग बॉस १५च्या सुरुवातीला जय भानुशालीने प्रतीकला त्याच्या उंचीवरून चिडवत ‘छोटू फॉलो मी’ असे म्हटले होते. तर दुसरीकडे करण रागात शमिताला ‘आंटी’ म्हणाला. त्यामुळे सोशल मीडियावर करणला ट्रोल केले जात आहे.