बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे हे १५ वे पर्व सुरु आहे. बिग बॉसमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओ विशाल कोटियन हा शमिता आणि राकेश बापटच्या रिलेशनशिपवर कमेंट करताना दिसत आहे. दरम्यान, शमिता आणि विशाल एकमेकांना भाऊ-बहिण बोलतात आणि असं असुनही विशालने तिच्या रिलेशनशिपवर कमेंट केल्याचे पाहून शमिता संतापली आहे.

‘बिग बॉस’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात दाखवण्यात आलं आहे की ‘बिग बॉस’च्या घरात पत्रकार एण्ट्री करतात आणि स्पर्धकांना प्रश्न विचारतात. अशाच एका व्हिडीओत एक पत्रकार विशाल कोटियनला विचारतो शमिताला बहिण बोलतोस आणि दुसरीकडे बोलतोस की राकेशने शमिताला पटवून ‘बड़ा हाथ मारा है’.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

यावर स्पष्टीकरण देत विशाल बोलतो जे बोललो ते सगळं मस्करीत सुरु होतं. मात्र, हे ऐकल्यानंतर शमिताला राग आला आणि पत्रकारांसमोरच ती विशालला ओरडत म्हणाली, ही काय मस्करी करण्याची गोष्ट नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओत विशाल म्हणाला होता की शिल्पा शेट्टीच्या बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये येऊन राकेश बापटने एक मोठी झेप घेतली आहे. तो म्हणतो, “उसने बडा हाथ मारा है…”

आणखी वाचा : लग्नाआधीच विकी आणि कतरिनामध्ये झालं जोरदार भांडण? ‘हे’ ठरलं कारण…

दरम्यान, राकेश आणि शमिताची भेट ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झाली होती. तिथे ते रिलेशनशिपमध्ये आले होते. त्यानंतर शमिता ‘बिग बॉस १५’ मध्ये आली आणि तिच्या पाठोपाठ वाईल्ड कार्ड एण्ट्री म्हणून राकेश आला होता. मात्र, त्याची तब्येत ठीक नसल्याने त्याला शोमधून बाहेर जावे लागले.

Story img Loader