‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो मानला जातो. मात्र तरीही हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागच्या काही काळापासून प्रेक्षकांमध्ये या शोच्या नव्या पर्वाची उत्सुकता होती. पण आता ‘बिग बॉस १६’ ची प्रतीक्षा आता संपणार आहे. अखेर ‘बिग बॉस १६’ चा प्रोमो प्रदर्शित झाला असून सलमान खानचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. यासोबतच बिग बॉस १६ च्या घराची झलकही पाहायला मिळाली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांनी ‘बिग बॉस १६’ च्या थीमबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ शोबद्दलची उत्सुकता वाढवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये सलमान खानची एंट्री पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो, “१५ वर्षांपासून बिग बॉसने सर्वांचा खेळ पाहिला आहे. यावेळी बिग बॉस आपला खेळ दाखवणार आहेत. सकाळ होईल पण चंद्र आकाशात दिसेल. गुरुत्वाकर्षण हवेत उडेल आणि घोडा सरळ चालेल. सावलीही निघून जाईल, स्वतःचा खेळेल खेळ. कारण यावेळी बिग बॉस स्वतः खेळणार आहे.” या धमाकेदार संवादासह सलमान खानचा लूकही खूपच धमाल आहे.
आणखी वाचा- ‘बिग बॉस १६’बद्दलच्या अफवांना पूर्णविराम, या दिवशी सुरू होऊ शकतो कार्यक्रमाचा नवा सीझन

बिग बॉस १६ चा टीझर पाहून सर्वजण सलमान खानची स्तुती करत आहे. पण सलमानच्या लूक व्यतिरिक्त यावेळी या रिअॅलिटी शोची थीम काय असेल असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होता त्याचंही उत्तर मिळालं आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे बिग बॉसचे घर थोडे रहस्यमय दिसत आहे. यावेळी बिग बॉस १६ चे घर आणि नियम वेगळे असणार असल्याचे होस्ट सलमान खानच्या डायलॉग्सवरून स्पष्ट होते. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर बिग बॉस १६ हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खानने दिलेल्या हिंटनंतर अतुल कपूर या शोमध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतुल कपूर बिग बॉसचा वॉइस आर्टिस्ट आहे. बिग बॉसचा आवाज असलेला अतुल कपूर हे एक प्रसिद्ध नाव बनले आहे. यावेळीही तो भाग घेऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा- ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २१ दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला, प्रक्षेपणाची तारीख ठरली

निर्मात्यांनी अद्याप बिग बॉस १६ च्या प्रसारणाची तारीख जाहीर केलेली नाही. प्रोमोद्वारे, निर्मात्यांनी सांगितले आहे की ते लवकरच बिग बॉस १६ चे नवीन एपिसोड आणणार आहेत पण त्यांनी तारीख उघड केलेली नाही. निर्मात्यांनी बिग बॉस १६ च्या स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. पण फैजल शेख, उर्फी जावेद, विवियन डिसेना, शिविन नारंग, मुनाव्वर फारुकी ते पूनम पांडे यांची नावं या पर्वासाठी चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 promo release theme change and even salman khan look mrj