Varun Dhawan & Kriti Sanon In Bigg Boss 16: नवनवीन गोष्टी ट्राय करायच्या असो किंवा एखाद्या अन्य कलाकारांचं प्रमोशन करायचं असो, भाईजान सलमान खान कधीच यात मागे पडत नाही. बॉलिवूडमध्ये सलमान आजवर अनेकांच्या बुडत्या करिअरला आधार दिला आहे. सलमान होस्ट करत असणारा शो बिग बॉस १६ वरही अनेक सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येतात. अलीकडेच भेडिया चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री क्रिती सॅनॉन बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते.वरुण आणि त्याची सहकलाकार क्रिती सॅनन त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस 16 च्या सेटवर पोहोचले होते. एपिसोडमधील एका मजेदार प्रोमोमध्ये सलमानने वरुणला स्वतःला चावण्यास सांगितल्याचे दिसत आहे.

वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक रील शेअर केले आहे. वरुणच्या रीलमध्ये सलमान खानने चेहऱ्याला लांडग्याचे फिल्टर लावले आहे. वरुणच्या आगामी भेडिया चित्रपटासाठी केलेली ही एक प्रमोशन रील आहे, पण यात आपला चेहरा पाहून सलमानही चक्रावतो व नंतर हसू लागतो, सलमानला ‘भेडिया’ रूपात पाहताच वरुणच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत. सोशल मीडियावर वरुणने हि रील पोस्ट करून म्हणून मला त्याला चावावं लागलं असं लिहिलं आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

खरंतर वरुण भेडीयांच्या भूमिकेत चित्रपटात अनेकांना चावताना दिसणार आहे यावरूनच सलमानने हा विनोद केला. सलमान, क्रिती व वरून यांनी बॉग बॉस १६ च्या सेटवर ठुमकेश्वरी या गाण्यावर डान्सही केला.

दरम्यान, अमर कौशिकच्या हॉरर-कॉमेडीमध्ये वरुण एका लांडग्याने चावलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र रोज रात्री मोठ्या लांडग्याच्या रूपात बदलते अशी या चित्रपटाची कहाणी आहे. २५ नोव्हेंबरला वरुणचा भेडिया चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Story img Loader