‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री स्नेहलता वसईकर आज आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतीच ती टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. स्नेहलता सोशल मीडियावरदेखील चर्चेत असते. नुकतीच तिने जागतिक पुरुष दिना निमित्त पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या भावाचा आणि पतीचा फोटो पोस्ट करत त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्नेहलता बिग बॉसमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे मात्र तरीदेखील तिने या दिवसाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. ती असं पोस्टमध्ये म्हणाली आहे, असं म्हणतात की ‘यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते! मी म्हणेन अगदी तसेच यशस्वी स्त्रीच्यामागेदेखील खंबीर पुरुष असतो! माझ्या ही आयुष्यात अश्या दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांना जागतिक पुरुष दिनानिमित्त मी धन्यवाद देऊ इच्छिते, त्या दोन व्यक्ती म्हणजे माझे श्रीमान आणि माझा भाऊ,’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्नेहलताने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकांप्रमाणे तिने चित्रपट वेबसीरिज या माध्यमांमध्ये काम केले आहे . ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली. या लूकमुळे तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला. मात्र त्यावर तिने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची तोंड बंद केली होती. या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका साकारली होती. अनेकदा स्नेहलता तिचे आणि कुटुंबाचे फोटो शेअर करत असते.

Story img Loader