‘बिग बॉस’च्या घरातले ‘प्रेमी-युगल’ गौहर आणि कुशाल आनंदी असून, त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचे भासत असले, तरी एकमेकांविषयी वाढत असलेली अधिकारात्मकतेची भावना त्यांच्यात दुरावा निर्माण करत आहे. एजाझचे गौहरसाठीचे असलेले आकर्षण हा देखील कुशालसाठी मोठा चिंतेचा विषय झाला आहे. कामयाच्या अचानक जाण्याने, घरातील सर्व सदस्य खिन्न झले आहेत. त्यांच्यात नवचैतन्य जागविण्यासाठी ‘बिग बॉस’ घरात गाणी वाजवतो, ज्यायोगे घरातील सदस्य प्रेरीत होऊन त्यावर नाच करतील आणि घरातील वातावरण आनंदी होईल.

घरातील सर्व सदस्य ‘डान्स फ्लोअर’वर नाचत असताना, कुशाल आणि एजाझ एका कोपऱ्यात अलिप्तपणे बसलेले असतात. गौहर कुशालला नाचण्यासाठी आग्रह करते. परंतु तो नकार देतो. कुशाल नाचण्यासाठी नकार देत असल्याने, गौहर एजाझला नाचण्यासाठी बोलवते. यामुळे कुशाल चिडतो आणि तेथून निघून जातो. कुशाल निघून गेल्याचे लक्षात येताच, गौहर घरात जाऊन त्याला बाहेर आणते. बाहेर आल्यावर देखील कुशालचा राग कायम असतो. जेव्हा गौहर त्याला खाण्यासाठी आग्रह करते, तेव्हा तो खायला नकार देतो. दुसरीकडे, कुशाल आणि गौहरमध्ये एजाझमुळे दुरावा निर्माण होत असल्याचे समजावत, दोघांपासून लांब राहण्याचा सल्ला संग्राम एजाझला देताना दिसतो. दुसऱ्या दिवशीदेखील गौहर आणि कुशालमधला तणाव सुरूच राहतो.

Story img Loader