‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांनी त्यांच्यातील छुप्या कला-गुणांची चुणूक दर्शवली आहे. कधी अॅण्डीने व्हिजेगिरी करत, एजाझचे गायन आणि नकला करत, तर गौहरने नृत्याद्वारे आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले आहे. स्पर्धकांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी ‘बिग बॉस’ने यावेळच्या कार्यात घरातील स्पर्धकांना गाणे रचून ते गायला सांगितले आहे. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांची दोन गटात विभागणी करून, घरातील त्यांच्या अनुभवांना गाण्यामार्फत कथन करण्यास सांगितले आहे. टीम ‘ए’मध्ये अरमान, संग्राम आणि अॅण्डी यांचा समावेश करण्यात आला आहे, तर टिम ‘बी’मध्ये कामया, गौहर, कुशाल आणि एजाझ आहेत.
नेहमीप्रमाणे ‘बिग बॉस’ने कार्यात थोडा ‘टि्वस्ट’ दिला आहे. स्पर्धकांना काही मिनिटांसाठी एका फिरणाऱ्या खुर्चीवर बसून, नंतर स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्यास सांगण्यात येते. जी टीम न धडपडता आणि न अडखळता परफॉर्म करेल, ती ४ लाख रोख रकमेची विजेती ठरेल.
अरमानची टीम घरातील ‘जहन्नूम ते जन्नत’च्या प्रवासाचे वर्णन गाण्यात गुंफते, तर कामयाची टीम ‘साथ-७’ या थिमवर गाणे तयार करते. कोणती टीम जिंकते हे पहाणे नक्कीच मनोरंजक ठरेल.

Story img Loader