बहुचर्चित रिआलीटी शो ‘बिग बॉस ७’चा फायनलीस्ट आणि कुस्तीपटू संग्रामचा मॉडेल पायल रोहतगीशी आज (गुरूवार) साखरपुडा झाला. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा झाल्याचे पायल रोहतगीने आपल्या ट्विटरअकाऊंटवर ट्विट केले आहे.
पायल म्हणते, महाशिवरात्रीचा मुहुर्तसाधून माझा संग्रामशी साखरपुडा झाला. शंकर भगवानने आजपर्यंत आम्हाला दिलेल्या आशीर्वादाचे आभार. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
संग्राम आणि पायल यांच्या गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांची २०११ साली एका रिआलीटी शो दरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज मोठ्या थाटात दोघांचा साखरपुडा झाला आहे. पायल रोहतगी याआधीही चर्चेचा चेहरा राहीलेली आहे. २००८ सालच्या बिग बॉसच्या दुसऱया पर्वात पायलही सहभागी होती. त्यावेळी पायलचे राहुल महाजनसोबत नाते जुळले होते. परंतु, त्यानंतर काही अंतर्गत वादामुळे त्यांचे ब्रेक-अपही झाले. तसेच २०१० साली दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हर्षेल गिब्जसोबत पायलचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचीही चर्चा होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा