‘बिग बॉस’च्या घरातील कामया आणि संग्राम हे स्पर्धक खूप कणखर आहेत. ‘बिग बॉस’ने दिलेले प्रत्येक कार्य ते खंबीरपणे निभावून नेतात. यावेळी ‘लक्झरी बजेट’ कार्याचा एक भाग म्हणून, अॅण्डी, संग्राम आणि कामया यांना ‘बिग बॉक्स’ नामक कार्यात मोठ्या बॉक्सच्या आत बसण्याचे कार्य सोपविण्यात येते. जो स्पर्धक जास्त वेळ हे कार्य करेल, तो ‘टिकेट टू फिनाले’ चा विजेता होईल आणि त्याला ‘ग्रॅण्ड फिनाले’मध्ये थेट प्रवेश मिळेल.

जवळजवळ १९ तास बॉक्सच्या आत बसल्यानंतर अॅण्डी बॉक्सच्या बाहेर पडतो. तिघांमध्ये तो सर्वप्रथम बाहेर येतो. संग्राम आणि कामया बॉक्सच्या आत बसून आपले कार्य चालू ठेवतात. हे करत असताना कामया आणि संग्राम ‘बिग ब्रदर’ या युकेमधील अशाच धर्तीच्या शोधीमधील, अशाच प्रकारच्या कार्याचा रेकॉर्ड मोडीत काढतात. ‘बिग ब्रदर’मधला हा रेकॉर्ड २६ तासांचा होता. ‘बिग बॉस’ याची घोषणा करून, त्यांचे अभिनंदन करतो. घरातील इतर मंडळी सुध्दा त्यांचे कौतुक करतात. रेकॉर्ड मोडल्यावर सुध्दा कामया आणि संग्राम ‘ग्रॅण्ड फिनाले’मध्ये जाण्याच्या उद्देशाने हे कार्य सुरूच ठेवतात. ते कोणता नवीन रेकॉर्ड प्रस्तापित करतात, हे पाहाणे मनोरंजक ठरेल.

Story img Loader