‘बीग बॉस’च्या घरात ज्याच्या भोवती वादाचे मोहळ उठले होते आणि ज्याने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तो कुशाल टंडन पुन्हा एकदा ‘बीग बॉस’च्या घरात प्रवेश करीत आहे. अखेर, अनेक तर्क-वितर्कानंतर आज रात्री कुशाल ‘बीग बॉस’च्या घरात प्रवेश करतांना दिसणार आहे. अॅन्डीबरोबरच्या आक्रमक आणि गैरवर्तनासाठी कुशालला काही आठवड्यांपूर्वी ‘बीग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. यावेळी त्याच्याबरोबर घराबाहेर पडलेली गोहर खान दुसऱ्याच दिवशी ‘बीग बॉस’च्या घरात पुन्हा दाखल झाली. कुशालचे सुध्दा या घरात पुनरागमन होईल अशी आशा प्रेक्षकांना होती. कुशालने ‘बीग बॉस’च्या घरातील आपल्या वर्तनाबद्दल ‘बीग बॉस’ची माफी मागीतली असून, ‘बीग बॉस’ने देखील त्याला माफ करत पुन्हा एकदा घरात दाखल होण्याची संधी दिली आहे.
‘बत्तमीज दील’ गाण्यावर कुशालचा ‘बीग बॉस’च्या घरात दमदार प्रवेश होतो. सदर गाणे सुरू होताच गोहर खानला खात्री होते, की नक्कीच कुशाल घरात प्रवेश करीत आहे आणि ती प्रवेशद्वारापाशी धावत जाते. प्रवेशद्वार उघडताच गोहर आणि कामया त्याचे मिठी मारून स्वागत करतात, तर तनिषा आणि अॅन्डी मागेच उभे राहणे पसंत करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुशालला पाहून अरमान कोहली देखील आनंदीत होतो आणि मिठी मारून त्याचे स्वागत करतो.

कुशालसुध्दा अॅन्डी आणि तनिषासकट प्रत्येकाला भेटवस्तू देत मिठी मारून त्यांची चौकशी करतो. यासर्व प्रकारात गोहर एकटी पडलेली दिसते. घरातील सर्वजण कुशालचे मोठ्या दिलाने स्वागत करतात. परंतु, कुशालच्या परत येण्याने अॅन्डी आणि तनिषाच्या चेहऱ्यावरची नाराजी झळकते. कुशालबरोबर कसे वागावे या विषयी साशंक असलेले हे दोघे त्याला पुन्हा एक संधी देण्याचा विचार करतात.
कुशाल खरच बदलला आहे का? अॅन्डी त्याला कधी माफ करेल का? या प्रश्नांची उत्तरे ‘बीग बॉस’च्या घरात लपली आहेत.

Story img Loader