‘बिग बॉस ७’ मधली प्रत्येक गोष्ट सध्या चर्चेचा विषय होत आहे. त्यातील स्पर्धकांची भांडण, मारामारी असो किंवा रोमान्स. त्यांच्या या कृत्यांना कंटाळलेल्या सलमानने रागाच्या भरात यावेळी हा सिझन आपला अखेरचा सिझन असल्याचे जाहीर केले. ‘बिग बॉस ७’ या रिअॅलिटी शोचा सलमान सूत्रसंचालक आहे.
शोमध्ये बिग बॉसद्वारे दिलेल्या टास्कदरम्यान, टीव्ही अभिनेता कुशाल टंडनने अभिनेत्री तनिषासोबत केलेल्या दुर्व्यवहाराला कंटाळून ही चेतावनी दिली आहे. शनिवारच्या भागात सलमानने कुशालची चांगलीच कानउघडणी केली. “तुम्हाला वाटत असेल की या शोमधून गेल्यानंतर तुमची प्रतिमा तुम्ही लगेच सुधारू शकाल, तर हे चुकीचे आहे. शोदरम्यान आपल्या चुकीच्या वागण्याचा आपल्या प्रतिमेवर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणामही होतात, मी स्वत: हे भोगले आहे. अशा गोष्टी लोकांच्या मनात कायम राहतात. या अशा वागण्यामुळे बिग बॉसमध्ये माझा हा शेवटचा सिझन असेल, असेही सलमान म्हणाला. थोड शांत झाल्यावर सलमानने कुशालला चांगल्या शब्दात समजावलेही. यावेळी ‘बालिका वधू’ मालिकेने प्रसिद्ध झालेल्या प्रत्युषा बॅनर्जीलादेखील सलमानने सुनावले. ती एक मुलगी असून, दुस-या मुलीबाबत वाईट कसे बोलू शकते, असे तो म्हणाला.
सलमानने त्याच्या ट्विटमध्ये लिहले आहे की, या दोन्ही स्पर्धकांना शोमधून काढले पाहिजे असे बिग बॉसच्या प्रेक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, तुम्ही जेवडे पाहता, ऐकता तेवढीच ती घटना नसते. तुम्ही केवळ एक तासाचा भाग पाहता. पण, मला पूर्ण आठवडाभर सगळच पाहाव लागत. जर कोणत्या स्त्रीबाबत असा घाणेरडा व्यवहार कोणी करत असेल, तर सर्व त्याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.

 

Story img Loader