ब्रिटीश अभिनेत्री आणि गायिका सोफिया हयात ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. शनिवारी झालेल्या एव्हिक्शनमध्ये संग्राम सिंग, अँण्डी, कुशल टंडन आणि सोफिया यांची नावे होती. मात्र, यावेळी सोफियाला बिग बॉसला बाय बाय करावे लागले.
सोफियाने घरातून बाहेर पडल्यावर आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, घरातल्या काही सदस्यांशी जमवून घेणं कठीण झाल्यामुळे मला बिग बॉसमध्ये अजून काही दिवस राहणे कठीण झाले असते. तसेच, इतर सदस्यांनी अरमानला लवकरात लवकर बाहेर काढावे. लोकांना तो शोमध्ये करत असलेली मारामारी पाहणे आवडत असावे, त्यामुळे तो अजून बिग बॉ़समध्ये आहे. परंतु, हे चुकीच आहे. गौहर ही पहिल्या दिवसापासूनच प्रामाणिक राहिली आहे त्यामुळे तिनेच जिंकावे असे मला वाटते, असे सोफिया म्हणाली.

Story img Loader