ब्रिटीश पाकिस्तानी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ७’ या रिअॅलिटी शो मधील स्पर्धक सोफिया हयात दिने अरमान कोहली या स्पर्धकाविरूद्ध पोलिस तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण लोणावळ्याच्या हद्दीत झाल्यामुळे लोणावळा पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आलं आहे. ‘बिग बॉस ७’ च्या घरात ४ डिसेंबर रोजी अरमान कोहलीने सोफियाला मारहाण आणि शिवीगाळ केली, अशी सोफियाची तक्रार आहे. पोलिसांनी अरमान कोहली विरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४ आणि ५०९ अनुसार गुन्हा दाखल केला आहे. सोफिया नुकतीच ‘बिग बॉस ७’ मधून बाहेर पडलीय.
अरमान कोहलीविरूद्ध सोफिया न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असून, ती ब्रिटीश नागरिक असल्यामुळे ब्रिटीश वकिलातीमध्येही अरमानच्या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय तिने घेतलाय.

Story img Loader