‘बिग बॉस’च्या घरातून कुशालच्या अचानक जाण्याने गौहरला मोठा धक्का बसतो. ‘बिग बॉस’च्या घरात कुशाल आणि एजाझशी जवळचे संबंध असलेल्या गौहरने एजाझबरोबरची मैत्री देखील संपुष्टात आणली. कुशाल गेल्यापासून गौहर घरातील सदस्यांशी जास्त संभाषण न करता अलिप्त राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी, गौहरला चांगले वाटावे म्हणून अॅण्डी आणि तनिषा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तनिषा तिला दिलासा देण्यास जाते, परंतु गौहर तिच्याशी संभाषण करण्याचे टाळते. शेवटी, तनिषा तिचा नाद सोडून देते. यानंतर, अॅण्डी तिला हसविण्याचा प्रयत्न करतो. अॅण्डीच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळते आणि गौहर थोडेसे स्मितहास्य करते. दोघेजण काही काळ आनंदात घालवतात. थोड्या वेळाने गौहर कॅमेऱ्याच्या माध्यमातून ‘बिग बॉस’ला सांगते की, ती कणखर असून, कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी समर्थ आहे. कुशालला स्वत:ची कमजोरी न हाऊ देता, या शोमध्ये सर्वोत्तम खेळ खेळणार असल्याचे देखील ती ‘बिग बॉस’ला सांगते. गौहर पुन्हा कशाप्रकारे या खेळात आपले योगदान देते ते येणाऱ्या भागांमध्ये पाहणे मनोरंजक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा