लोकांमध्ये कुतूहल आणि उत्साह कसा निर्माण करायचा हे सलमानला चागंलेच माहीत आहे. ‘बिग बॉस’च्या नव्या सिझनचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक तर्क लावले जात होते. मात्र, आता प्रदर्शित झालेला दुसरा टीझर आणखीनच विचार करायला लावणारा आहे.
‘बिग बॉस’चा दुस-या टीझरमध्ये निदान नव्या सिझनची कल्पना तरी मिळेल असे वाटत होते. पण, हा टीझर तर अधिकचं रहस्यमयी निघाला. पहिल्या टीझरमध्ये विमान उडवण्यासाठी सज्ज झालेल्या वैमानिकाच्या पोशाखात सलमान खान दिसला होता. तर दुसर-या टीझरमध्ये तो कागदाचे विमान बनवून उडवताना दिसतो. त्यामुळे ‘बिग बॉस’चा हा सिझन नक्की काय घेऊन येतोय याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे.

Story img Loader