बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सलमान खान नुकतेच ‘बिग बॉस- ९’च्या सेटवर एकत्र नाचताना दिसले. रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आला होता. त्यावेळी रणवीरने सलमान खानला ‘बाजीराव मस्तानी’तील ‘मल्हारी’ या गाण्यातील नृत्याच्या काही स्टेप्स शिकवल्या. रणवीरने यावेळी ‘पिंगा’ या गाण्यातील दीपिका-प्रियांकाच्या नृत्याच्या काही स्टेप्स करून दाखविल्या. एकुणच या दोन्ही अभिनेत्यांचा उत्साह आणि बेधडक अंदाज यामुळे ‘बिग बॉस’चा हा भाग चांगलाच रंगलेला पहायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा