‘बिग बॉस ९’ चा विजेता ठरलेला प्रिन्स नरूला हा या कार्यक्रमामुळे चांगलाच प्रकाशझोतात आला. या कार्यक्रमात त्याला त्याचं प्रेमही गवसलं. प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी यांची बिग बॉसच्या घरातच चांगली मैत्री झाली आणि मग या मैत्रीचे रूपांतर प्रेमार झाले. या शोमुळे प्रिन्स नरूलाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
प्रिन्स नरुला एका अडचणीत सापडला आहे. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रामपूरजवळील एका हॉटेलमध्ये प्रिन्सचा कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टदरम्यान नशेत असलेल्या पुरुषांच्या गटाने एकमेकांशी भांडण केले आणि त्यांच्यात तुंबळ मारामारीला सुरुवात झाली. त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली ज्यामुळे ते जखमी झाले. हा गोंधळ पाहता लगेचच प्रिन्स आणि त्याच्या टीमला ग्रीन रूममध्ये नेण्यात आलं.
आणखी वाचा : विमानतळावर एका अनोळखी महिलेची बॅग हातात घेतली अन्… सुपरस्टार अजित कुमारच्या कृतीने वेधलं लक्ष
‘इंडिया टूडे’शी विशेष संवाद साधताना, प्रिन्स नरुलाने कॉन्सर्टमध्ये नेमके काय घडले याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला, “हे काही गंभीर प्रकरण नव्हते. कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी जमली होती. सुमारे ८००० ते ९००० लोक जमले होते. काहीजण दारूच्या नशेत होते म्हणून ते आपापसात भांडू लागले. त्यामुळे त्यांनी आम्हाला सुरक्षेसाठी मंचावरून दूर नेले जेणेकरून जमाव शांत होईल.”
प्रिन्स नरुला सध्या ‘रोडीज १९’ मध्ये गँग लीडर म्हणून दिसण्यासाठी सज्ज आहे. सध्या यासाठी ऑडिशन्स सुरू आहेत. ‘रोडीज: कर्म या कांड’मध्ये रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी देखील टोळीचे नेते आहेत. हा सीझन सोनू सूद होस्ट करणार आहे. प्रिन्स नरुला ‘स्प्लिट्सविला ८’, ‘बिग बॉस ९’ आणि ‘नच बलिये ९’सारख्या कार्यक्रमांचा विजेतादेखील आहे.