Priyanka Deshpande Wedding: बिग बॉस फेम अभिनेत्रीने घटस्फोटानंतर ३ वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. तिने तिच्या लग्नातील खास फोटो शेअर करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री व तिचे कुटुंबीय आनंदी दिसत आहेत.

प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि बिग बॉस तमिळ सीझन 5 फेम प्रियंका देशपांडेने दुसरं लग्न केलं आहे. तिने १६ एप्रिल रोजी ४२ वर्षीय डीजे वाशी साचीशी लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियंकाचा दुसरा पती कोण आहे, तो काय करतो याबद्दल जाणून घेऊयात.

३२ वर्षीय प्रियंका देशपांडेचा दुसरा नवरा वाशी साची हा लोकप्रिय डीजे आणि बिझनेसमन आहे. त्याची क्लिक 187 नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. तो पार्ट्या आयोजित करतो. वाशी साची हा मनोरंजन उद्योगातील एक लोकप्रिय चेहरा आहे. अनेक वर्षांपासून तो हाय प्रोफाइल लग्नांचे इव्हेंट मॅनेजमेंट करतो. तसेच अनेक नावाजलेले क्लब, डिस्कोथेक आणि खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करतो. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, वाशी आणि प्रियंका देशपांडे यांची पहिली भेट त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान झाली होती.

कशी झाली प्रियांका व वाशीची भेट?

प्रियंका त्याने आयोजित केलेला एक कार्यक्रम होस्ट करत होती. तिथून दोघांची ओळख झाली आणि ते हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. नंतर दोघे प्रेमात पडले आणि आता त्यांनी त्यांच्या नात्याला नाव द्यायचं ठरवलं. अखेर दोघांनीही आपलं नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. प्रियांका व वाशी यांचं चाहते अभिनंदन करत आहेत.

प्रियंका देशपांडेचा पहिला घटस्फोट का झाला?

प्रियंका देशपांडेने पहिले लग्न प्रवीण कुमार याच्याशी केलं होतं. दोघांनी २०१६ मध्ये लग्न केलं. प्रियंकाने तिचे पहिले लग्न मोडण्याचे कारण कधीच सांगितले नाही. २०२२ मध्ये प्रियंका आणि प्रवीणच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. पण ती या चर्चा अफवा असल्याचं म्हणत होती. नंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले. घटस्फोटानंतर तीन वर्षांनी प्रियंकाने दुसरं लग्न केलं आहे. लग्नाच्या फोटोंमध्ये ती व तिचा पती खूप आनंदी दिसत आहेत.