अभिनेत्री व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरला पोलिसांनी अटक केली आहे. ही सोशल मीडिया स्टार ‘बिग बॉस तेलुगू’मध्ये झळकली होती. सोनू श्रीनिवास गौडा असं तिचं नाव असून तिला शुक्रवारी (२२ मार्च रोजी) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्या अटकेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोनूने कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनू श्रीनिवास गौडा हिने मुलगी दत्तक घेताना योग्य प्रक्रियेचं पालन न केल्याने तिला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, असंही पोलिसांनी सांगितलं. तक्रारदार अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सोनू गौडाने रायचूर येथून दत्तक घेतलेल्या आठ वर्षांच्या मुलीसह तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर रील पोस्ट केले होते. यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या

तिचे रील व्हायरल झाल्यावर बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्याने तक्रार दिली आणि नंतर सोनू गौडाला अटक करण्यात आली. “मिळालेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही सोनू गौडाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.