‘वैजू नंबर १’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सोनाली पाटीलला ओळखले जाते. उत्तम अभिनयासोबतच आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे सोनालीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या या स्वभावामुळे बिग बॉस मराठी ३ च्या पर्वात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम संपून अनेक महिने उलटले असले तरी सोनाली ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनाली पाटीलचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती. नुकंतच सोनालीने तिचा हा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा अनुभव शेअर केला आहे.
सोनालीने तिची तब्येत सुधारल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली म्हणाली, “माझ्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. देवाची कृपा असल्यानेच मी त्या अपघातातून वाचले. माझा अपघात झाला तेव्हा मी पुण्यात होते. पुण्यातील चाकण हायवेवरुन जात असताना एका भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने मला जोरदार धडक दिली. यात माझ्यासह तो बाईकस्वारही खाली पडला.”
अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला लग्नापूर्वीचा किस्सा, म्हणाली “आम्हाला जबरदस्ती एका…”
“त्याने दिलेली ती धडक इतकी जबरदस्त होती की मी रस्त्यातच बेशुद्ध झाले. तिकडे जमलेल्या लोकांनी मला जवळीच रुग्णालयात दाखल केले. मला दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध आली आणि त्यानंतर मी माझ्या पालकांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यानंतरच सर्वांना या अपघाताची माहिती मिळाली”, असेही सोनालीने सांगितले.
“या अपघातात माझ्या मानेला गंभीर दुखापत झाली. यामुळे मला खूप वेदना होत आहेत. अपघातानंतर मी काही दिवस आयसीयूमध्ये होते. त्या डॉक्टरांनी मला काही दिवस देखरेखीखाली ठेवलं होतं. पण आता हळूहळू मी या अपघातामधून बरी होत आहे. केवळ देवाची कृपा असल्यानं मी या अपघातामधून वाचले”, असेही सोनालीने म्हटले.
“माझं जास्त जागरण होऊ नये म्हणून तिने…”, निलेश साबळेने केले पत्नीचे कौतुक
दरम्यान, सोनालीचा अपघात झाल्याची बातमी बिग बॉस मराठी ३ मधील स्पर्धक विकास पाटील याने सांगितली होती. विकासने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी तिच्या हाताला मलमपट्टी केल्याचे दिसत होते. यावेळी विकासने सोनालीबरोबरचा फोटो शेअर करत पोस्टही शेअर केली होती. ‘सोनी पाटील लवकर बरी हो… एक हात गळ्यात असला तरी ताकद तेवढीच आहे पोरीत. आताही सगळ्यांना लोळवू शकते लवकर बरं व्हा आणि मैदानात उतरा पाटील’, असे यावेळी विकासने म्हटलं होते.