छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. बिग बॉस मराठी ३ चे सुत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकर करत आहेत. अलीकडेच महेश यांच्या मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर बिग बॉसच्या प्रोमो शूटच्यावेळी त्यांना किती वेदना झाल्या या विषयी त्यांनी पत्रकार परिषदेते सांगितले आहे.
महेश मांजरेकर यांनी पत्रकरा परिषदेते या विषयी सांगितले आहे. ‘जेव्हा मी शोचा पहिला प्रोमो शूट केला तेव्हा मला वेदना झाल्या. इतकेच नाही तर शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. चित्रीकरणावेळी त्या कॅमेऱ्यात दिसू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. मी मनोरंजन क्षेत्रात आहे आणि त्यामुळे मी या गोष्टींबद्दल तक्रार करू शकत नाही. चित्रीकरण करताना मी खूप अस्वस्थ होतो. परंतु माझी ही अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू न देता मी हे चित्रीकरण पूर्ण केले. हा प्रोमो सर्वांना आवडला याचा मला सर्वाधिक आनंद आहे,’ असे महेश म्हणाले.
आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..
View this post on Instagram
आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…
मुंबईतील एका रुग्णालयात महेश मांडरेकर यांना दाखल करण्यात आले होते. महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. महेश मांजरेकर उपचारांनतर पुन्हा घरी परतले होते. घरी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी ‘बिग बॉस मराठी ३’ च्या पहिल्या प्रोमोचे चित्रीकरण केले. ‘बिग बॉस मराठी ३’ चा ग्रँड प्रिमियर १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.