छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा अखेर झाली आहे. अभिनेता विशाल निकम याने बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचे विजेतपद पटकावलं आहे. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले. मात्र यामुळे काही स्पर्धकांची मैत्रीही झाल्याची पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेणारा स्पर्धक आदिश वैद्य हा नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत असतो. आदिश बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्या आणि इतर स्पर्धकांमध्ये बऱ्याचदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसचा कार्यक्रम संपल्यानंतर नुकतंच आदिश वैद्यने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या खेळाचे कौतुक केले आहे.

आदिशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मीराच्या बिग बॉसच्या खेळाचे कौतुक केले आहे. यावेळी आदिश म्हणाला, “तुम्ही आम्हाला बिग बॉसच्या घरात एकमेकांना त्रास देताना पाहिले आहे. आम्ही टास्क खेळलो आणि जिंकण्यासाठी खेळलो. मी तिला माझे पाय धुवायला लावले कारण तो एक टास्क होता. पण मला फार वाईट वाटले. पण त्यानंतर तिने माझे कपडे घेतले आणि ते पायाखाली तुडवत धुण्याचा प्रयत्न केला.”

“आता इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग का?” डान्सच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ट्रोल

“पण प्रामाणिकपणे आम्हाला त्यातील प्रत्येक गोष्ट आवडली. हाच थरार. काहीजण एकमेकांना मारण्यासाठी गर्दी करतात. तरीही एकमेकांना आव्हान देतात. जेव्हा दोन उग्र व्यक्तिमत्त्वे एकत्र येतात, तेव्हा असेच होते. आम्ही एकमेकांना थोडे आधी ओळखत होतो. या प्रवासात आम्ही आणखी मजबूत झालो आणि जवळ आलो. मिराची एक गोड बाजू आहे जी तुमच्यापैकी अनेकांना माहित नाही!” असेही तो म्हणाला.

“अभिनेत्री होण्याचे माझे स्वप्न नव्हते…”; दिशा पाटनीने केला खुलासा

“पण काहीही असो. पण ही मुलगी जिथे जाईल, त्यासाठी मी तिला शुभेच्छा देतो,” असेही त्याने म्हटले. दरम्यान या पोस्टसोबत त्याने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने बिग बॉसमधील काही क्षण कोलाज करुन पोस्ट केले आहेत. त्या व्हिडीओ त्या दोघांचा एक छान फोटोही त्याने यात टाकला आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 3 serial adish vaidya emotional instagram post for mira jagannath nrp