छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद विशाल निकम याने पटकावले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु असताना अनेकदा विशालने सौंदर्या हिचा उल्लेख केला होता. त्यामुळे विशालची ही सौंदर्या नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र विशालच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचे सांगितलं आहे.
विशाल निकम हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी विशालने सौंदर्याबद्दल एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना कळकळीची विनंतीही केली होती. ती एक सामान्य मुलगी असून, अभिनयसृष्टीशी तिचा काही एक संबंध नाही, मला थोडा वेळ द्या…, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते.
राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…
यानंतर आता नुकतंच एका मुलाखतीत विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. “मी बिग बॉसच्या घरात ज्या सौंदर्याचा उल्लेख केला होता, आता मात्र माझा तिच्याशी काहीही संपर्क नाही. आमच्या दोघांचे नाते फार काळ टिकू शकलं नाही”, असे विशालने म्हटले.
‘ई टाईम्स’शी बोलताना विशालने सौंदर्याशी ब्रेकअपबद्दल भाष्य केले. त्यावर तो म्हणाला, “सौंदर्याशी माझं ब्रेकअप झालं आहे. सौंदर्याशी असलेल्या रिलेशनशिपवरून मी खोटं बोलतोय असं आता अनेक लोकांना वाटत असेल. पण हे अगदी खरं आहे. सौंदर्या ही माझी गर्लफ्रेंड होती, पण आता मात्र मी सिंगल आहे.
“मी सध्या माझ्यावर कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. बिग बॉस मराठीनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. मी जिथेही जायचो, तिथे मला लोक सौंदर्याबद्दल विचारायचे. म्हणूनच मी सर्व चाहत्यांना ब्रेकअपबद्दल सांगायचं ठरवले आहे. माझ्यासाठी हे फार कठीण आहे. लोक कदाचित माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांना मी खोटं बोलतोय, असं वाटेल. पण मी खोटं बोलत नाही. मूव्ह ऑन होणं खूप कठीण आहे पण मी सध्या प्रयत्न करतोय”, असे विशाल निकमने सांगितले.
“…तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जायचे?”, रितेश देशमुखचा संतप्त सवाल
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक नेटकऱ्यांनी विशाल निकमच नाव अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत जोडलं होतं. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. त्याशिवाय हे फोटो व्हायरल करुन हीच विशालची सौंदर्या तर नाही ना? असा प्रश्नही विचारला जात होता. तर अनेकांनी अक्षया हीच विशालची सौंदर्या आहे, असे सांगितले होते.
विशाल आणि अक्षयानं ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. हे फोटो मालिकेतील आहे. या गोष्टीवर आता विशाल निकमने आक्षेप घेत चाहत्यांना थांबण्यासाठी विनंती केली आहे.