छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद विशाल निकम याने पटकावले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्यानंतर विशाल हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच त्याने हळद लागली, हळद लागली… अशा आशयची एक पोस्ट केली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशाल निकमने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्याच्या घरातील हळदी सभारंभाचे आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने “हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली!” असे म्हटले आहे. विशालने ही पोस्ट त्याच्या भावासाठी केली आहे.

“मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

विशाल निकमचा भाऊ सुरज निकम याचे लग्न आहे. त्याच्या हळदी सोहळ्याचे काही खास फोटो विशालने शेअर केले आहेत. त्यात तो त्याच्या भावाला हळद लावताना दिसत आहे. यात विशाल हा फार आनंदात असल्याचेही पाहायला मिळत आहे. विशाल निकमने त्याच्या कुटुंबातील काही क्षण यानिमित्ताने शेअर केले आहेत.

“माझा तिच्याशी काहीही संबंध नाही…”, सौंदर्यासोबत ब्रेकअप झाल्याचा विशाल निकमचा खुलासा

विशाल निकमच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत विशालला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. तर एका नेटकऱ्याने उरका तुमचं पण यंदा, अशी कमेंट केली आहे. त्यासोबतच एका नेटकऱ्याने विशाल तुला कधी हळद लागणार असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.