छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच सिद्धार्थने या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. नुकतंच त्याने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.

‘दे धक्का २’ चित्रपट आज शुक्रवारी (५ ऑगस्ट) पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. त्यावेळी सिद्धार्थ जाधवला तू बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फार हटके उत्तर दिले.

Gashmeer Mahajani on Chhaava Controversy
Video: एकाच चित्रपटात दुहेरी ऐतिहासिक भूमिका करणारा गश्मीर महाजनी ‘छावा’च्या वादाबद्दल म्हणाला, “माझा अनुभव…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
Prithviraj Chavan On Meeting with Donald Trump
Prithviraj Chavan : “डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलो नाही…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांचा मुलगा…”
Elon Musk News
Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलॉन मस्क यांचा हिटलरप्रमाणे नाझी सॅल्युट? सोशल मीडियावर खळबळ
Donald Trump Speech
Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख, “देवाने मला वाचवलं कारण..”
PM Modi Congrats Donald Trump on Twitter
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या खास शुभेच्छा; म्हणाले, “ऐतिहासिक…”

यावर उत्तर देताना मकरंद अनासपुरेंनी सिद्धार्थ जाधवची मस्करी केली. त्यावर ते म्हणाले, “मला त्यादिवशी महेश मांजरेकर सर म्हणाले की बिग बॉसमध्ये सिद्ध्याला एंट्रीबद्दल विचार असं म्हणाले होते. म्हणून मीही त्याला त्याबद्दल बोललो.”

Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?

त्यापुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “येत्या ५ ऑगस्टला ‘दे धक्का’ येतोय. तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहावा, अशी इच्छा आहे. मला बिग बॉसचा अनुभव खूप मस्त आहे. महेश सरांमुळे मला ती संधी मिळाली होती. त्याच्याविषयी मी आताच काहीही बोलू शकत नाही, कारण मी वेगळ्या कामासाठी इथे आलोय. माझी उत्सुकताही ‘दे धक्का २’ ची आहे.”

“हा प्रश्नही या काळात, ज्या लेव्हला विचारला जातो, त्या लेव्हलला येण्यासाठी मला महेश मांजरेकर आणि ‘दे धक्का’नेच साथ दिली. कुठेतरी मला त्यांनी एक स्टँड दिला आहे. त्यामुळे कदाचित कोणीही कोणत्याही कार्यक्रमासाठी माझा विचार करत आहे. छान कार्यक्रमासाठी माझा विचार करत असतील. पण सध्या दे धक्काची उत्सुकता मला आहे.”

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा होस्ट ठरला? महेश मांजरेकरांच्या जागी ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा

“त्यासोबत ‘बिग बॉस’बद्दल बोलायचं असेल तर मला एकदा हिंदी बिग बॉससाठी विचारण्यात आलं होतं. पण मला असं वाटतं की ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ असे किंवा यासारखे रिअॅलिटी शो करणे जास्त आवडतात”, असे सिद्धार्थ जाधव म्हणाला.

दरम्यान सध्या सिद्धार्थ जाधव हा दे धक्का 2 या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader