छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यानंतर आता या कार्यक्रमातील स्पर्धकांची नावं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता हार्दिक जोशीनंतर आणखी एका प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याला बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली आहे.

‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच लोकप्रिय ठरले होते. त्यामुळेच प्रेक्षकांना चौथ्या पर्वाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या पर्वासाठी कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच ‘कलर्स मराठी’कडून त्यांना बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होण्याबद्दल विविध कलाकारांना विचारणा करण्यात येत आहे. नुकतंच अभिनेते किरण माने यांना बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले आहे. सध्या किरण माने हे ही ऑफर स्विकारायची की नाही याबद्दल विचार करत आहेत. तर दुसरीकडे निर्माते हे त्यांना या शो मध्ये येण्यासाठी विचारताना दिसत आहेत.

किरण माने हे या शो मध्ये यावेत यासाठी मालिकेचे निर्माते कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. एखाद्या मालिकेतून बाहेर पडणे, त्यांच्यावर होणारे वादग्रस्त आरोप, फेसबुक पोस्टवरुन होणारे ट्रोलिंग यामुळे ते चर्चेत आहेत. याच सर्व गोष्टींमुळे ते या मालिकेत असावेत असे सातत्याने निर्मात्यांना वाटत आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २१ दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला, प्रक्षेपणाची तारीख ठरली

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असायचे. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जात होती.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं.

Story img Loader